Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदीच्या जबड्यात फसलेला लोखंडी डब्बा काढण्यात एकनिष्ठा गौ सेवकांना यश*

 (खामगांव प्रतीनिधी)


*नंदीच्या जबड्यात फसलेला लोखंडी डब्बा काढण्यात एकनिष्ठा गौ सेवकांना यश* 




*दिनांक 11/08/2025*

खामगांव : दिनांक 06/08/2025 बुधवारी सायंकाळी 6:37 ला घाटपुरी नाका पाण्याच्या टाकी मागील परिसरात एका महिलेने तिच्या घरा समोर रसगुल्ल्याचा डब्बा नंदी जवळ ठेवला त्या नंदीने घाई गडबडीत खाण्याचा प्रयत्न केला तसाच त्या डब्ब्यात नंदीचा जबडा अडकला होता. घटनेची माहिती एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनला दिनांक 07/08/2025 रोजी सकाळी 7 वाजता ओम सिंघानिया व महिला नागरिकांनी फोनद्वारे माहिती दिली एकनिष्ठा गौ सेवक सुरजभैय्या यादव यांच्यासह चेतन कदम , पृथ्वीराज पिंपळेकर , अतुल माहूरकर , कैलास बेलूरकर , निखिल थोरात , हिमांशू खराटे , रामा , शुभम आदि गौ सेवकांनी आपल्या जिवाची परवा न करता त्या नंदीचा रेस्कयुव करत लगातार तीन दिवसा पासून रात्रदिवस पाठलाग सुरू ठेवला वेदनेने तो नंदी सेरावैरा झाला होता इलेक्ट्रीक पोलला तर कधी भिंतीला डोकं मारत होता नंदी दुःख वेदनानी घायाळ झालेला होता त्याची अवस्था पाहिल्या जात नव्हती शेवटी तिसऱ्या दिवशी दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:20 ला नारायण गार्डन घाटपुरी नाका पाण्याची टाकी स्थित जवळ नंदीच्या जबड्यातून डब्बा काढण्यात एकनिष्ठा गौ सेवकांना यश मिळाले तीन दिवसा पासून वेदनेने तडफडत उपाशी नंदीला चारा पाणी खाता पिता येत नव्हते डब्बा काढताच नंदीने मोकळा श्वास घेत जेवणाचा आस्वाद आनंदाने घेतला शर्तीच्या प्रयत्नांनी जिद्द आणि गौ सेवकांच्या चिकाटीने दोरीच्या सहाय्याने नंदीवर काबू मिळवत खालच्या जबड्या मध्ये अडकलेला लोखंडी पत्र्याचा डब्बा काढण्यात गौ सेवकांनी यश मिळविले अशी माहिती एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन शहर सचिव चेतन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.




Post a Comment

0 Comments