*माटरगाव बु येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या समस्ये बाबत भरारी महिला ग्रामसंघाचे ग्रामपंचायतला निवेदन सादर*
माटरगाव बु येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी समूहातील सदस्यांनी केली असता त्या विहिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला विहिरीच्या परिसरात गुरेढोरे बांधलेली असतात त्यामुळे तो परिसर सुद्धा खूप घाण झालेला आहे यावेळी विहिरीचे पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका आहे, प्रत्येक कुटुंबाला फिल्टर बसविणे शक्य नाही आणि दररोज फिल्टरचे पाणी विकत घेणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे विहिरीला बारीक जाळी बसवावी व बाजूने कंपाउंड करावे आमच्या ह्या समस्येची ग्रामपंचायत नि लवकरात लवकर दखल घ्यावी अशा प्रकारे निवेदन ग्रामविकास अधिकारी श्री. सावरकर सर यांना देण्यात आले, यावेळी ग्रामसंघ पदाधिकारी व कॅडर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments