*उमाताई बोचरे ता, प्रतीनीधी नांदुरा*
विश्व परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मा.गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना
उपविभागीय अधिकारी साहेब/तहसीलदार साहेब, यांच्यामार्फत पाठविलेल्या पत्रात असे नमूद केलेले आहे की
विषय : नांदुरा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या अपराध क्र.०५५३/२०२४ मध्ये देशद्रोह कलम लावणे बाबत
आम्ही आपणस विनंती पूर्वक निवेदन देतो की नांदुरा तालुक्यातील वडणेर भुलजी येथे दि १६/९/२४ रोजी काही समाजकंटकांनी ईद चा मिरवणूकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद चा घोषणा दिल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये निदर्शनास आले संदर्भात नांदुरा येथे बजरंग दल पदाधिकारी यांनी दखल घेत पोलीस स्टेशन नांदुरा यांना विश्व हिंदु परिषद. बजरंग दल कडून तक्रार दिली आहे परंतु सदर तक्रार मध्ये नमूद असताना देश विघातक कृत्य करणाऱ्या लोकांवर कोठेही राष्ट्रद्रोही, देशद्रोही गुन्हा अद्याप दाखल नाही तरी सदर व्हिडिओ मध्ये स्पष्ट असताना व व्हिडीओ त्याच गावातील मुस्लिम समाजातील नागरिकानी स्टेटस, फेसबुकवर व्हायरल केला असताना सदर पुरावे असून सुद्धा देशद्रोहाची कलम लावण्यात आलेली नाही तरी आम्ही आपणस या निवेदनाद्वारे सर्व भारतीय तीव्र रोष व्यक्त करत निवेदन देत असून सदर गुन्ह्याची लवरकरात लवकर चौकशी करून पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर कडक कारवाई चे आदेश संमंधीत विभागास देण्यात यावे तसेच देशविरोधी शक्तींनी सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये डोके वर काढल्याची घटना दिवसेंदिवस वाढत चालली आहे अशीच घटना बाजूला अकोल्यात आतंकवादयाचे पोष्टर ईदचा मिरवणूकीमध्ये लावल्याचे दिसून आले त्यामुळे अशा मानसिकतेचा समाजकंटक देशद्रोही लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करावे जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या मानसिकतेला आळा बसेल व देशाचे वातावरण गढूळ करणाऱ्या मानसिकतेला समज मिळेल तरी सर्व भारतीय समाजव्यवस्था व समाज बांधवांचा विचार करून देशद्रोह अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा बजरंग दल लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल व आंदोलनाची सर्व जबाबदारी संमंधीत विभागाची राहील कळावे ही विनंती सदर पत्रकात केली होती. त्यानुसार दिनांक एक सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर बजरंग दल कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू सुरू केले आणि. अकरा वाजता नांदुरात तहसीलदार यांना सदर बाबतचे निवेदन सादर करून अमोल जी अंधारे यांनी चर्चा केली नांदुरा पोलीस प्रशासनाने आरोपी विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नव्हता सदरचा गुन्हा दाखल करावा असेही तहसीलदार यांना सांगण्यात आले तेव्हा ठाणेदार यांनी सांगितले की सदर बाबतचे अनेक व्हिडिओ मोबाईलवर असून आम्ही फॉरेन्सिक लॅबला आवाजाच्या नमुन्यासाठी पाठविलेला आहे सदर बाबत त्याचा रिपोर्ट आल्यावर पुढील कार्यवाही पोलीस प्रशासन करेल असे ठाणेदार नांदुरा यांनी सांगितल्याचे समजते. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेअमोल जी अंधारे विदर्भ प्रांत सह मंत्री सुशील कोल्हे जिल्हा संयोजक तानाजी वणारे, भारत भाऊ चोपडे, मुकेश दादा फणसे, गजानन भाऊ कुराळे, केशव राऊत, योगेश कोल्हे सह जवळपास ३०० बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे चे कार्यकर्तते उपस्थित होते. सदर आरोपींना नांदुरा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही तो दाखल करावा यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलना चा कार्यक्रम आयोजित केला होता



Post a Comment
0 Comments