*
महाराष्ट्र दर्शन न्युजचा प्रथम वर्धापण दिवस उत्साहात साजरा*
खामगांव :- येथील सामान्य रुग्णालयात आज दिनांक 1/01/2025 रोजी महाराष्ट्र दर्शन न्युजचा प्रथम वर्धापण दिवस केक कापून व तसेच भोजन वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दर्शन न्युजचे संपादक राजु घाटे यांनी कुठलाही व्यर्थ खर्च न करता सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना भोजन प्रसादाचे वाटप करून समाजा समोर एक आदर्श निर्माण करून सामाजिक उपक्रम राबवून कौतुकास्पद कार्य केले. त्यांच्या या कार्याचे कौतुक विविध सामाजिक संघटना व तसेच पत्रकार बंधु नागरिकां कडून होत आहे आणि शुभेच्छाचा वर्षाव सुद्धा होत आहे.


Post a Comment
0 Comments