(राजु घाटे ): *पैशाच्या वादातून भावानेच आपल्या चुलत भावावर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. तसेच दोन महिलांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना आज दुपारी शेगाव तालुक्यातील माटरगाव बु. येथे आज घडली* मिळालेल्या
महितीनुसार मागील काही दिवसांपासून पैशाच्या कारणावरून शत्रुघ्न मिरगे रा. माटरगाव व त्याचा चुलत भाऊ सोपान मिरगे रा. भास्तन यांच्यामध्ये वाद सुरु होता. दरम्यान शत्रुघ्न मिरगे हे पती व सालीसह आज दुपारी माटरगाव येथील बाजारात गेले होते. यावेळी त्यांचा चुलत भाऊ सोपान मिरगे याने तेथे येऊन त्यांच्याशी पुन्हा त्याच कारणावरून वाद घालून शत्रुघ्न मिरगे यांच्यावर कुल्हाडीने सपासप वार केले. यावेळी भांडण आवरण्यासाठी गेलेल्या शत्रुघ्न मिरगे यांची पत्नी राणी मिरगे व साली मोनाली भागवत चंडाळणे यांनाही सोपान मिरगे याने कुऱ्हाडीने मारहाण केली. यावेळी नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शत्रुघ्न मिरगे व इतर दोन महिलांना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून शत्रुघ्न मिरगे यांना मृत घोषित केले. तर गंभीरित्या जखमी झालेल्या राणी मिरगे व मोनाली चंडाळणे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतकचे वडील श्रीराम ओंकार मिरगे रा. भास्तन यांनी जलंब पोस्टेला तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सोपान सदाशिव मिरगे, सौ. मीना सोपान मिरगे दोघे रा. भास्तन ता. शेगाव यांचेविरुद्ध कलम १०३ (१), ११८,३ (५) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास। जलंब पोलीस स्टेशन ठानेदार सपोनि अमोल सांगळे हे करीत आहेत.
Post a Comment
0 Comments