Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शेगाव तालुक्यातील अवैध बंद करण्यासाठी शेगांव तालुका पत्रकार संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन.. विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगाव तालुक्यात व शेगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. वरली, मटक्याच्या दुकानांची श्री संत गजानन महाराज मंदिरापासून सुरवात होऊन शेगावच्या आठवडी बाजारात पर्यंत वरली मटक्याचे दुकाने खुलेआम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात लाखोंची उलाढाल होत असलेले जुगारचे अड्डे शेगाव शहर व ग्रामीण भागात चालू आहेत, या व्यतीरक्त अवैध रीतीने देशी दारूची विक्री, तितली भवरा, देह व्यापार मोठ्या प्रमाणात चालू असून यामुळे शेगाव शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे तसेच गोर गरिबांचे संसार या अवैध धंद्यामुळे उधवस्त होत आहेत. तरुण पिढी वाम मार्गावर लागण्याच्या वाटेवर आहे, याला जबाबदार कोण व हे अवैध धंदे कोणाच्या अशिर्वादाने सुरु आहेत याचा शोध घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक यांनी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी शेगांव येथील पत्रकारांच्या वतीने आज करण्यात आली आहे. शेगाव येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्याकडे सामजिक व राजकीय संघटना मुग गिळुन गप्प असल्यामुळे शेवटी पत्रकार संघटनेने शेगांव शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे पूर्णतः बंद व्हावे यासाठी पुढाकार घेतलेला आहे. शेगाव मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर ०५/०३/२०२०५ रोजी शेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस उपधिक्षक खामगाव याच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा उपस्थीत पत्रकारांनी दिला आहे. *Cen.news* इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा रिपोर्टर शेगाव

 




शेगाव तालुक्यातील अवैध  धंदे बंद करण्यासाठी शेगांव तालुका पत्रकार संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन..



विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगाव तालुक्यात व शेगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. वरली, मटक्याच्या दुकानांची श्री संत गजानन महाराज मंदिरापासून सुरवात होऊन शेगावच्या आठवडी बाजारात पर्यंत वरली मटक्याचे दुकाने खुलेआम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात लाखोंची उलाढाल होत असलेले जुगारचे अड्डे शेगाव शहर व ग्रामीण भागात चालू आहेत, या व्यतीरक्त अवैध रीतीने देशी दारूची विक्री, तितली भवरा, देह व्यापार मोठ्या प्रमाणात चालू असून यामुळे शेगाव शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे तसेच गोर गरिबांचे संसार या अवैध धंद्यामुळे उधवस्त होत आहेत. तरुण पिढी वाम मार्गावर लागण्याच्या वाटेवर आहे, याला जबाबदार कोण व हे अवैध धंदे कोणाच्या अशिर्वादाने सुरु आहेत याचा शोध घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक यांनी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी शेगांव येथील पत्रकारांच्या वतीने आज करण्यात आली आहे.


शेगाव येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्याकडे सामजिक व राजकीय संघटना मुग गिळुन गप्प असल्यामुळे शेवटी पत्रकार संघटनेने शेगांव शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे पूर्णतः बंद व्हावे यासाठी पुढाकार घेतलेला आहे.


शेगाव मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर ०५/०३/२०२०५ रोजी शेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने  पोलीस उपधिक्षक खामगाव याच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा उपस्थीत पत्रकारांनी दिला आहे.




Post a Comment

0 Comments