Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यात.


 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यात.





महाराष्ट्रातील शासकीय अधिस्वीकृती समितीसह सर्व क्षेत्रातील लेखक संपादकासह पत्रकारांची उपस्थिती राहणार


अधिवेशनात विविध समाजसेवकांचे विचार मंथन


मा .मुख्यमंत्री व मंत्री महोदय विद्यमान आमदार खासदार यांनाही आमंत्रित करणार.



केंद्रीय व राज्य कोअर कमिटी च्या बैठकीत निर्णय.


अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, भारत केंद्रीय व राज्य कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच पार पडली. सदर बैठकीत केंद्रीय व राज्यस्तरीय अधिवेशना संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय व राज्य अधिवेशन राष्ट्रीय स्तरावरील ताडोबा उद्यान भव्य वन वैभव पर्यटन क्षेत्र व ऐतिहासिक पुरातन गडकिल्ले व मंदिरे असलेल्या विविध धार्मिकतेने  परंपरा जपत असलेल्या विविध कलावैभव व आदिवासी संस्कृती नटलेल्या जगप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे प्रेरणा स्तोत्र आनंदवन आणि सलंग्न गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव्यात असलेले समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध असलेला हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प,  समाजसेवक डॉ.राणी व डॉ.अभय बंग सर्च फाउंडेशन, देवाजी तोफा यांचे लेखामेंढा राष्ट्रीय स्तरावर प्रचलित   असलेल्या सलंग्नित महाकाली नगरीतील चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक३ व ४

 मे २०२५ ला आयोजित करण्याचा निर्णय राज्य व केंद्रीय बैठकीमध्ये घेण्यात आला. सदर बैठकीदरम्यान एकदिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध स्थळांना भेट देण्यात येऊन पाहणी करण्यात आली. सदर बैठकीत केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदीप  जोशी, राष्ट्रीय सचिव अशोक पवार, राष्ट्रीय संपर्क प्रमुख प्रा. रवींद्र मेंढे, राष्ट्रीय सदस्य बाळासाहेब सोरगिवरकर, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक , नवनियुक्त महिला मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रा. डॉ.मंजुषा सागर, जिल्हाध्यक्ष अशोक पारखी इतर जिल्ह्यातील पत्रकार सामाजिक स्तरावरील मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments