*अखील भारतीय महीला साव कलाल समितीच्या अध्यक्षा सुनिता ताई बावनेर यांनी केली सौ. चंदा सुरेश ददगाळ यांची अखिल भारतीय साव कलाल समाज समिती महिला आघाडीच्या सहकोषाध्यक्षपदी निवड
बुलढाणा : समाजसेवेत सक्रीय असलेल्या सौ. चंदा सुरेश ददगाळ यांची अखिल भारतीय साव कलाल समाज समिती महिला आघाडीच्या सहकोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची घोषणा समितीचे अध्यक्ष मा. सुनिलभाऊ खराटे आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा मा. सुनीताताई रविंद्र बावनेर यांनी केली.
सौ. चंदा ददगाळ या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, विविध संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत. त्या अध्यक्ष संत गजानन बहुउद्देशीय संस्था, पारस या संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. याशिवाय, त्या भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग महिला आघाडीच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच राष्ट्रीय रेल्वे महिला संघटनेच्या देखील त्या सक्रिय सदस्य आहेत.
सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या नियुक्तीने बुलढाणा जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजकार्याची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. *

Post a Comment
0 Comments