फटाके व पेढे वाटून शासनाचे मानले दिव्यांगांनी आभार
(खामगाव शहर)
(
प्रतिनिधी प्रणीताताई देवगीरीकर)
राज्य सरकारच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने दिव्यांग निराधार अनुदान मध्ये एक हजार रुपये वाढ केल्याची घोषणा केली
या करिता विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटून उपविभागीय अधिकारी कार्यालय टावर चौक येथे जल्लोष साजरा केला
यावेळी दिव्यांग बांधवांचा उत्साह वाढविण्याकरिता ओबीसी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, दिव्यांग मार्गदर्शक गणेश भाऊ सोनवणे प्रसाद भाऊ तोडकर दत्ताभाऊ काळुसे भ्रष्टाचार निर्मूलन समिती प्रदेशाध्यक्ष भास्करभाऊ शेगोकार रामाभाऊ बोरसे संस्था अध्यक्ष मनोज नगरनाईक यांची उपस्थिती लाभली
यावेळी दिनांक 14/0 6 /2025 रोजी केशकर्तन करून शिवजल् अभिषेक घालत निराधार अनुदान 6000 करण्यात यावे याकरिता बच्चुभाऊ कडू यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित दादा पवार यांना तहसीलदार करवी निवेदन सादर केले होते
या मध्ये अल्प का होईना एक हजार रुपये वाढ करण्यात आली
या आंदोलना दरम्यान प्रहार शहराध्यक्ष शत्रुघन इंगळे शेखर तायडे मिलिंद धुरंदर विनोद पवार दीपक चिकाने मनोज पालीवाल मंगेश अंभोरे या दिव्यांग बांधवांनी मुंडन केले होते या साठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालीत थोडं थोडं का होईना यश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला
या दरम्यान पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत सरकारचे विशेषता बच्चुभाऊ कडू यांचे आभार मानले
यावेळी
रील स्टार सदानंद हिवराळे उर्फ पुष्पा यांनी आपल्या कलेतून सादरीकरण करण्यात आले
मिलिंदभाऊ मधुपवार ,
किशोर भाऊ मोहकर विजय श्रीनाथ मोहम्मद रईसभाई,गोपाल म्हात्रे,सुरेंद्र चव्हाण, भगवान वडोदे, अमोल वसे, गणेश हेलोडे ,विजय नाईक, उमेश देशमुख दिलीप भिंगे हरिनारायण ठाकरे जय नंद वानखडे रमेश नागपूरकर आकाश वानखडे विनीत लल्लन विश्वास देशमुख, रितेश भारसाकळे सुधाकर बोदडे तानाजी तांगडे संजय वाशिमकर दत्ता भोगे जगन्नाथ दिवेकर शेखर इंगळे प्रकाश तोटे दिलीप गांधी धनंजय जोशी गजानन चव्हाण शोभाताई भारसाकळे कविता इंगळे वंदना चिखलकर बेबीताई शेगोकार वंदना जाधव आदी यावेळी उपस्थित होते
तर निराधार अनुदान सहा हजार रुपये होत नाही , त्यांच्या अडचणी सुटत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी दिली



Post a Comment
0 Comments