Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रत्येक संस्थेला रोजगार उपलब्ध करून देऊ - जयदेव ठाकर

 

प्रत्येक संस्थेला रोजगार उपलब्ध करून देऊ - जयदेव ठाकर


ऑनलाइन कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन



 देशभरातील प्रत्येक संस्था, एनजीओ आणि एखाद्या व्यक्तीला लघु उद्योगाच्या माध्यमातून दोन पैसे कमावण्याची संधी देऊन प्रत्येक संस्थेला रोजगार उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन ग्लोबल बिजनेस सेंटरचे जयदेव ठाकर यांनी केले.

     आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर रविवारी (ता. ६) एक पाऊल उद्योगाकडे हर घर रोजगार या विषयावार महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, राजस्थान राज्यातील एनजीओ, संस्थेच्या प्रतिनिधींना ऑनलाइन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. ठाकर बोलत होते. कार्यशाळेचे अध्यक्ष आर बी डिजीटलचे संचालक सचिन धुमाळ होते. प्रास्ताविक विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशनच्या सोनल कोद्रे यांनी केले, आभार पंजाब पवार यांनी मानले .पुढे बोलताना जयदेव ठाकर म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा न करता एनजीओ आणि संस्थांच्या संचालकांनी लघु उद्योग स्थापन करून परिवारातील प्रत्येक सदस्याला रोजगार कमावण्याची संधी द्या. तुमच्यामुळे शहर, गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या. जेणे करून गाव खेड्यातील तरुण रोजगारासाठी मोठ्या शहराकडे जाणार नाही. गावात राहून तोच सक्षम बनला पाहिजे. आणि हे सर्व आर बी डिजीटलच्या माध्यमातून देशभरातील प्रत्येक एनजीओ, संस्थांना संधी देणार आहे. त्यामुळे प्रत्येक संस्था, एनजीओ संचालकांनी कोणाच्या निधीची वाट न पाहता इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेही श्री.ठक्कर यावेळी म्हणाले. कार्यशाळेत विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलींद जामनिक, उपाध्यक्ष ऊषा वनारे,सचिव विवेक नगरे ,अमोल पोटदुखे, सिद्धार्थ वाहुरवाघ, वैभव लकडे, सिद्धार्थ समदुरे, जया शेंडे,गोपाल काळे, अनुप ताले,कल्याण कुसूमडे, कल्याण धुमाळ, शिवाजी शिंदे, राम कवडे, दुष्यंत शेळके,भिमराव वैदय, भगवान माने, संभाजी शिंदे,सुरेश कन्नाके यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, राजस्थान राज्यातील विविध एनजीओ, संस्था संचालक उपस्थित होते. यावेळी एनजीओंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरासरही केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

--------------------------------

संधी देण्यासाठी कटिबद्ध

राज्यासह केंद्राच्या निधीपासून वंचित असलेल्या देशभरातील एनजीओ आणि संस्था संचालकांच्या विकासाठी आरबी डिजिटलच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केल्या जात आहे. त्याचा फायदाही अनेकांनी घेतला आहे. आरबी डिजीटल व ग्लोबल बिजनेस सेंटरच्या माध्यमातून ५० लाख ते तीन कोटी रुपयांपर्यंत वित्त सहाय्य करण्यात केले जाईल व स्वतः बळकट होऊन इतरांना रोजगार कसा उपलब्ध होईल यावर लक्ष्य केंद्रीत करा. आणि यासाठी सर्व संधी आर बी डिजिटल एनजीओ आणि संस्थांना देणार आहे. कोणाचीही आर्थिक फसवणूक होणार नाही याचीही काळजी आर बी डिजिटल घेणार आहे. फक्त एनजीओ आणि संस्थांनी सावध राहून काम करावे, असे आवाहन आर बी डिजिटलचे संचालक सचिन धुमाळ यांनी कार्यशाळेत केले.

----------------------

अनेक रोजगार उपलब्ध

एनजीओ आणि संस्थांना जास्त खर्चात न टाकता दीड हजाराच्या आसपास छोटे-मोठे उद्योग सुरू करण्याची संधी आहे. फक्त त्याची माहिती मिळत नसल्याने अनेक जण यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अशाच एनजीओ आणि संस्था संचालकांना तब्बल दीड हजार लघु उद्योगांच्या माध्यमातून सक्षम बनण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे ग्लोबल बिजनेस सेंटरचे संचालक जयदेव ठाकर यांनी सांगितले.

-----------------------------------------

फोटो ओळ - जयदेव ठाकर.

Post a Comment

0 Comments