Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सुलतानपुर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच यांच्या मासिक सभेला सदस्यांचा विरोध :

 

सुलतानपुर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच यांच्या मासिक सभेला सदस्यांचा विरोध :


लोणार प्रतिनिधी..

 


सुलतानपूर

येथील ग्रा.प चा मनमानी कारभार दिवसेंदिवस  वाढत असल्यामुळे आज दि ३० जून रोजी घेतलेल्या मासिक सभेला नऊ ग्राप सदस्यांनी विरोध केल्याने सरपंच किरण लाहोटी यांना विरोध झाला असून सरपंचा यांच्या बाजुला आठ सदस्यांनी समंती दर्शविली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि सुलतानपुर ग्राप च्या सरपंच पदी सौ किरण लाहोटी अडीच वर्षीपूर्वी विराजमान झाल्या मात्र गत अडिच वर्षापासून त्यांचा मनमानी कारभार सुरू होता, याबाबत वेळेवेळी सदस्यांनी तक्रारीही केल्या मात्र यावर ठोस कारवाई झाली नाही यामुळे ग्राप सदस्यांनी आज दि ३० जून रोजी मासिक सभा झाली या सभेत शासनाचे परिपत्रक वगळता विविध ठराव नऊ सदस्यानी बहुमता ने ' नामंजूर करून विरोध दाखव ला तर आठ सदस्य संरपचासह यांनी संमती दर्शविली .

यामुळे सरपंच यो च्या मनमानी कारभारा मुळे ग्राप सदस्य त्रस्त झाले आहे. यामुळे आगामी काळात ग्राप सदस्य सरपंच यांच्या विरोधात काय भुमिका घेतात याबाबत नागरिकांना उत्सुकता लागुन आहे.

 तसेच ग्रामसेवक गजा

नन कावरखे यांचीही मासिक सभेत बदली करावी याबाबत ठराव मंजुर झाला आहे हे विशेष.



सरपंच व सचिव मनमानी कारभार करतात याला त्रस्त होवून आम्ही मासिक सभेला बहुमताने विरोध दाखवला


संघपाल पनाड 

ग्राप . सदस्य

Post a Comment

0 Comments