!! नांदुरा येथे अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेची आढावा बैठक संपन्न!!
------------------------------------------------------------------
(नांदुरा प्रतीनीधी)
नांदुरा येथे भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय दिल्ली द्वारा मान्यताप्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेची बुलढाणा जिल्हा आढावा बैठक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नवीन बस स्टँड समोर पांडव मंगल कार्यालयाच्या बाजूला निधी अर्बन मागच्या हॉलमध्ये संपन्न झाली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. विनोद गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नंद गोपाल पांडे, अभिमन्यू वानखडे हे होते. तसेच जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते महिला व पुरुष सर्व उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जयश्रीताई देशमुख, मंगलाताई गर्दे, कावेरी जाधव, गायकवाड ताई, जगदाळेताई, रंजनाताई राठोड, चंदाताई जदगाळ गोटे ताई, चंदन गोळे ताई, कुसुमताई राऊत , गायगोड ताई, आदी उपस्थित असून कार्यक्रमाचे आयोजन निवृत्ती वाघ, , गजानन खवले, कावेरी ताई जाधव आदींनी केले होते.

Post a Comment
0 Comments