Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भरारी महिला ग्राम संघ माटरगाव बुद्रुक यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 भरारी महिला ग्राम संघ माटरगाव बुद्रुक यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी माटरगाव बु _   


               दिनांक 03/01/2026   शनिवार रोजी भरारी महिला ग्राम संघ माटरगाव यांच्या वतीने थोर समाज सुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रत्येक स्त्रीने घराबाहेर पडून समाजात स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करावी याबद्दल ग्राम संघाच्या सचिव सौ उषाताई गायकी यांनी सांगितले. महिलांनी शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात आघाडीवर राहणे किती गरजेचे आहे हे आपल्या भाषणांमधून ग्राम संघाचे अध्यक्ष उर्मिलाताई रोठे यांनी पटवून दिले . यावेळी ग्राम संघ पदाधिकारी , ग्राम सखी ज्योतीताई जगताप अनिताताई शिंगण , सुनीताताई नागपुरे , रुक्मिणीताई नागपुरे तसेच हर्षाताई इंगळे , सुनंदा शेगोकार , मंदा बोर्डे , शुभांगी राऊत , रूपाली देशमुख व समूहातील महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिताताई शिंगण तर आभार  प्रदर्शन सुनिता ताई नागपुरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments