Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मोताळा तालुक्यात अवैध धंदे मस्त, पोलीस प्रशासन सुस्त; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर* *प्रश्नचिन्ह*

 **मोताळा तालुक्यात अवैध धंदे मस्त, पोलीस प्रशासन सुस्त; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर* *प्रश्नचिन्ह*


**मोताळा* देि.१४/२/२०२६ रोजी तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाची निष्क्रियता चिंताजनक  बोरखेडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा जोरदार सुळसुळाट सुरू असून, विमल गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध दारूची खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात गुटखा आणि तत्सम पदार्थांवर बंदी असतानाही दिवसाढवळ्या शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात ही विक्री सर्रासपणे चालू असल्याने स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.स्थानिकांच्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक गावांमध्ये बस स्टँड, गावाच्या वेशीवर आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या जवळपास वरळी मटका (अवैध जुगार) चालवणाऱ्या दुकानांचा बोलबाला आहे. याशिवाय, अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दारूबंदीच्या कायद्याचे उल्लंघन करणारे टवाळखोर आणि दारुडे विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याने विनयभंग, चोरी आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण स्थानिकांनी नोंदवले आहे.एकूणच, तालुक्यातील क्राइम रेट वाढत असताना बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीत हे सर्व अवैध धंदे निर्लज्जपणे सुरू असतानाही पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली दिसत नाही. पोलिसांची कांदोळ्याची भूमिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. "दिवसाढवळ्या हे सर्व धंदे चालू असताना पोलीस कुठे आहेत? शाळा-कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?" असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.या संदर्भात बोराखेडी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांरी व पोलीस प्रशासन आता तरी अवैध धंदे थांबण्यासाठी  योग्य ते उपाययोजना करतील     स्थानिकांनी यापूर्वीही तक्रारी केल्या असून, तरीही कारवाई झालेली नाही, अशी तक्रार आहे. या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी आणि समाजावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments