*
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी जाहीर.*
( शेगांव प्रतीधिधी)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न दिनांक २८/५/२०२५ बुधवार रोजी दुपारी 2 वाजता शेगांव विश्राम गृहावर संपन्न झाली.
वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री अरुणभाऊ कुलथे होते तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री बाबाराव खडसे ह्यांची होती.
बैठकीत कैलासबापू देशमुख यांनी संघटनेची माहिती सांगीतली तर बाबाराव खडसे यांनी नवनियुक्त बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून राजु घाटे (पाटील) ह्यांच्या नांवाची घोषणा केली वरील बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री बाबाराव खडसे, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री अरुणभाऊ कुलथे, ह्यांच्या सत्कार श्री. सुरज यादव, राजु घाटे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरज यादव यांनी केले. सुरज यादव यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष राजु घाटे जिल्हा कार्याध्यक्ष आश्विन राजपूत, जिल्हा सचिव संतोष कुलथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभुदास पारस्कर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तु दांडगे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल भगत यांनी केले तसेच जिल्हा कार्यकारीणी मध्ये ह्यांच्या नांवाची घोषणा करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र , पुष्पगुच्छ देऊन स्वागत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या नियुक्ती निमित्ताने मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लवकरच तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासाठी कटिबद्ध राहणार तसेच लवकरच जिल्हा कार्यकारिणी बैठक आयोजित करून उर्वरित जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्ष जाहीर होणार अशी ग्वाही सुद्धा दिली. या कार्यक्रमात अध्यक्ष यांनी नवनियुक्त कार्यकारिणी ला शुभेच्छा दिल्या व संघटना वाढीसाठी कटीबद्ध राहून प्रयत्न करा , एकसंघ संघटीत राहा असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खामगांव शहर अध्यक्ष अविनाश घोडके यांनी केले



Post a Comment
0 Comments