*
नांदुरा पोलीसांची दमदार कामगीरी अवैधरीत्या जुगार चालु असलेल्या ठीकानी छापा*
(रंजना ताई राठोड नादुरा)
पोलीस स्टेशन नांदुराचे ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी नांदुरा शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये कुठेही अवैधरीत्या जुगार, दारू किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत याबाबत अधिनस्त अधिकारी व अमलदार यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज दिनांक 30/06/2025 रोजी नांदुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की नांदुरा शहरातील पंचवटी या भागामध्ये मोहन श्रीकृष्ण राखोंडे रा.पंचवटी नांदुरा खुर्द यांचे मालकीचे टीन पत्राचे खोलीमध्ये काही इसम एक्का बादशहा नावाचा जुगार पैशाची हारजीतवर खेळत व खेळवीत आहे अशा मिळालेल्या खबरेप्रमाणे पंचा समक्ष नमुद आरोपीतांवर छापा कारवाई केली असता आरोपी नामे...
1. सुरज शंकर माठे वय 24 वर्षे, रा. पंचवटी नांदुरा खुर्द
02. शिवराज श्रीकृष्ण कळसकार वय 43 वर्षे, रा. पंचवटी नांदुरा खुर्द
03. ऋतीक रविंद्र खंडारे वय 21 वर्षे, रा. पंचवटी नांदुरा खुर्द
04. विशाल रामु बग्गन वय 30 वर्षे, रा. आठवडी बाजार नांदुरा
05. नयन राजेश पालकर वय 21 वर्षे, रा. मारवाडी गल्ली नांदुरा
06. अतीष गजानन खर्डे वय 32 वर्षे, रा. पंचवटी नांदुरा खुर्द
07. सोपान ज्ञानदेश ढोले वय 21 वर्षे, रा. पंचवटी नांदुरा खुर्द
08. विक्की रविंद्र खंडारे वय 19 वर्षे, रा. पंचवटी नांदुरा खुर्द
09. शुभम जितेंद्र राठोड वय 20 वर्षे, रा. उमंग चौक नांदुरा
10. वेदिक श्रीराम करुटले वय 20 वर्षे, रा. वडी ता नांदुरा
11. अक्षय संजय सावन वय 25 वर्षे, रा. भिमनगर नांदुरा
12. शैलेश रामधन तायडे वय 25 वर्षे, रा. पंचवटी नांदुरा खुर्द
13. ताराचंद पप्पु गौहर वय 22 वर्षे, रा भिमनगर नांदुरा
14. अविनाश प्रल्हाद कल्याणकर वय 26 वर्षे, रा. खुदावंतपुर नांदुरा
यांना जागीच पकडून त्यांचे कब्जातून नगदी रोख रकमेसह जुगार साहित्य, मोबाईल फोन व घटनास्थळावर मिळून आलेले वाहने असा ऐकून किमती 5,00610 /- रुपयाचा जुगार मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे नमूद सर्व आरोपी विरुद्ध कलम 4,5 म.जु.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सफौ. मिलिंद जंजाळ, राहुल ससाने, कैलास सुरडकर, विनायक मानकर, योगेश निंबाळकर, विनोद भोजने, सुनील सपकाळ, पंकज डाबेराव, यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments